नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी आज ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश मागे घेतले. मात्र तिथल्या रहिवाशांनी स्थलांतरासाठी तयार रहावं, असा इशाराही दिला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी उद्रेक झालेल्या ताल ज्वालामुखीच्या परिसरातले भूकंपाचे धक्के आता कमी झाल आहेत. अगोनसिले आणि लॉरेल इथल्या रहिवाश्यांव्यतिरिक्त बाकीचे आपापल्या शहरात परतू शकतात, असं स्थानिक अधिकारी हेरपीलँडो मनडांस यांनी वार्ताहरांना सांगितलं.