मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

मेजर खडसे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक 15ऑगस्ट 2018 रोजी प्रदान करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 12 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 6 लाख रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित50 टक्के म्हणजेच 6 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.