नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत देशातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ या आजारावर केलेल्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेतला.

केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या मदत क्रमांकावरून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादांची क्षमता वाढवण्याचे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले.

या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक राज्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनं तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, घरातून काम करणं यांसारख्या उपायांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करता यावी यासाठी यापुढे हाती घ्यायच्या उपाययोजनांविषयी त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

या बैठकीतले निष्कर्ष आणि निर्णयांबद्दलची माहिती या आजारासंदर्भात स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या गटावर दिली जाणार आहे.