कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी सर्व सार्क सदस्य देशांबरोबर प्रधानमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी आपली मत मांडणं महत्त्व पूर्ण आहे.
सर्वोत्तम प्रयत्न करुनही कोरोना विषाणूमुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचा सामना कसा केला जाईल, याबाबत ठामपणे कोणीही सांगू शकत नाही, असं ते म्हणाले. सार्क देशांमध्ये अजूनतरी दिडशेहून कमी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असले, तरी सर्वांनी सर्तक राहण गरजेचं आहे, अशी सूचना त्यांनी केली.
सार्क देशांनी स्वेच्छेने योगदान देऊन कोविड-१९ आपत्कालीन निधी स्थापन करावा असा प्रस्ताव प्रधानमंत्री मोदी यांनी मांडला. यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलरचं असेल असं ते म्हणाले. भारत परीक्षण उपकरणासह डॉक्टर आणि तज्ञाचं जलद प्रतिसाद पथक तयार करत असल्याचं ते म्हणाले.
सभांव्य विषाणूवाहक आणि त्यांच्यासंपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी भारतानं एकत्मिक देखरेख पोर्टल सुरु केल्याचं मोदी म्हणाले. आपल्या शेजारी देशाचं सहकार्य संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण ठराव, असं आवहान त्यांनी केलं. मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी आपत्कालिन निधी स्थापनं करण्याच्या प्रधानमंत्री मोदीच्या प्रस्तावाचं स्वागत केलं.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सार्क देशांना परिक्षण उपकरणानंसह मदत देऊ केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी प्रधानमंत्र्यांनी सुचावलेल्या नविन उपक्रमांचं स्वागत केलं आणि नजिकच्या काळात परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवण्याची सूचना सर्व देशांना दिली.
वूहान मधून बांग्लादेशच्या २३ विद्यार्थ्यांना परत आणल्याबद्दल बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी मोदीचे आभार मानले. नेपाळचे प्रधानमंत्री के. पी.शर्मा ओली यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाचं महत्त्व अधोरेखित केलं.
भूतानचे प्रधानमंत्री डॉ.लोटे शेरिंग यांनी कोविड मदत निधी स्थापन करण्याच्या सूचनेचं स्वागत केलं. पाकिस्तानलाही कोरोना विषाणूबाबत अशाचं प्रकारची चितां वाटत असल्याचं पाकिस्तांचे आरोग्यमंत्री डॉ. जाफर मिर्जा म्हणाले.