नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे.

काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीनं हिरोयुकी एंडो आणि युटा वाटानाबे या पाचव्या मानांकित जपानी जोडीचा २१-११, २५-२३ असा पराभव केला.

अंतिम फेरीत भारतीय जोडीची लढत अव्वल मानांकित मार्कुस गिडन आणि केव्हीन सुकामुलीजो या इंडोनेशियन जोडीबरोबर होणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही लढतीत इंडोनेशियाच्या जोडीनं भारतीय जोडीवर विजय मिळवला असल्यानं, अंतिम फेरीत त्यांच पारडं जड आहे.