नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सरकारी कार्यालये बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात बस, रेल्वे, मेट्रो, मोनो देखील सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गरज नसेल तर प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन त्यांनी केले. आवश्यकता पडल्यास सार्वजनिक वाहतूक तसेच सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले. याशिवाय राज्यातल्या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दुकाने सुरूच ठेवावी असेही त्यांनी स्पष्ट केलं.