New Delhi: People wear protective masks to contain the spread of coronavirus (COVID-19) pandemic, at Khan Market in New Delhi, Monday, March 16, 2020. The number of cases in India has risen to 110. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI16-03-2020_000101B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार फिलिपिन्स, अफगाणिस्तान, मलेशिया या देशातनं भारतात येणाऱ्या सर्व विमानांना मज्जाव केला आहे.

आज दुपारपासून हे निर्बंध लागू होतील. या तात्पुरत्या उपाययोजना आहेत, ३१ मार्च नंतर या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.