नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि राज्य सरकारांच्या मदतीसाठी तीस अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे. ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत.

या साऱ्या अधिकाऱ्यांची एक बैठक आज होणार आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १३७ रूग्ण आढळले असून यामध्ये ११३ भारतीय तर २४ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामधील कोरोनाचे १४ रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनीकाल प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

देशातल्या सर्व खाजगी प्रयोगशाळांनी कोरोनाविषाणूची चाचणी विनामूल्य करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान परदेशप्रवास, व्हिसा, इमिग्रेशन या संदर्भात माहिती देण्यासाठी एक चोवीस तास उपलब्धअसणारी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती गृहविभागाचे अतिरिक्त सचिवअनिल मलिक यांनी दिली.

या हेल्पलाईनचा क्रमांक ०२० – २६१२७३९४ असून नागरिक SUPPORT.COVID19-BOI at the rate gov.in या ईमेलवरही संपर्क साधू शकतात. असंही त्यांनी सांगितलं.