नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगला देशानं एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे दोन्ही देशातल्या मैत्रीनं एक वेगळी उंची आणि दिशा गाठली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

बांगला देशाचं निर्मिती प्रमुख शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्म शताब्दी निमित्तानं ते बोलत होते. दोन्ही देशांनी सागरी सीमा आणि जमिनी सारखे जटील प्रश्न सौहार्दानं सोडवले आहेत. बांगलादेश हा  केवळ भारताचा दक्षिण आशियातला सर्वात मोठा व्यापारी भागीदार नसून विकासातलाही भागीदार आहे.

भारतात निर्माण झालेल्या विजेमुळे आज बांग्ला देशातले उद्योग आणि घरं उजळून निघाली आहेत, अश्या शब्दात मोदी यांनी दोन्ही देशातल्या मैत्रीचे गोडवे गायले.  बांगबंधूंनी बांगला देशाला आश्वासक आणि पुरोगामी राष्ट्र बनवलं आहे. आणि शेख हसीना बांगला देशाला योग्य दिशेनं घेऊन जात आहेत, असंही ते म्हणाले.