मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असून, ते चौथ्यांदा आमदार झाले आहेत. पटोले यांचं अभिनंदन करणारी भाषणं सभागृहात सुरु असून, शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेली व्यक्ती सभागृहाच्या अध्यक्षपदी निवडली गेल्याबद्दल सर्व पक्षीय सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे.