पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुणे : पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 203 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 231 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 115 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 77 आहे. कोरोनाबाधित एकूण 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 220 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 283 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 199, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 50, सांगली जिल्ह्यात 9, कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 618 कोरोना बाधीत रुग्ण असून 260 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 332 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 194 कोरोना बाधीत रुग्ण असून 586 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 507 आहे. कोरोना बाधित एकूण 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 137 रुग्ण असून 79 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 54 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 659 कोरोना बाधीत रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 233 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 98 हजार 394 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 94 हजार 343 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 51 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 82 हजार 461 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11 हजार 723 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
(टिप : – दि. 6 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)