मुंबई : आयआयटी, जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देशातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंच अड्डा २४७ ने जेआरएस ट्युटोरियल्ससह भागीदारी केली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उत्तर भारतातील नामांकित ऑफलाईन कोचिंग प्रदाता जेआरएस ट्युटोरियल्स ई-लर्निंगवर देखील आपले लक्ष केंद्रित करीत आहे. ही भागीदारी कोरोनाच्या संकट काळातील बदलत्या मागणीनुसार त्यांना ऑफलाईनवरून ऑनलाइन लर्निंग मंचावर येण्यासाठी सहाय्यता प्रदान करेल.
अड्डा २४७ चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागर म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळात शिक्षणाची जुनी प्रणाली म्हणजेच ऑफलाईन शिक्षण केंद्र आणि क्लासेस स्वतःला टिकविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडे लक्ष देणे पूर्णतः शैक्षणिक क्षेत्रावर अवलंबून आहे. याच बाबीवर लक्ष केंद्र करीत आम्ही जेआरएस ट्युटोरियल्स या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच्या नामांकित संस्थेसह हातमिळवणी केली आहे.’