मुंबई : मुंबईतलं प्रस्तावित आय.एफ.एस.सी. अर्थात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे. हे केंद्र मुंबईतच ठेवावं अशी विनंती पवार यांनी यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रातून केली आहे.

हे केंद्र गुजरातला हलवलं तर त्यामुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, तसंच त्यांचा आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारं आपल्या विनंतीकडे सकारात्मकतेनं पाहील असंही पवार यांनी म्हटलं आहे.