नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा जास्त दरानं विक्री करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं नुकतीच एक अधिसूचना काढून, मास्क आणि हँड सॅनिटायझर या दोन्हीचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याचं सांगून, या दोन्ही वस्तूंचा साठा किंवा काळाबाजार करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

कोरोनासंदर्भात अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करून वस्तू विकणे, यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.