नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारपासून अर्थात २२ मार्चनंतर आठवडाभर एकाही आंतरराष्ट्रीय विमानाला देशात उतरू दिलं जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे आणि विमान कंपन्यांनीही विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांव्यतिरीक्त इतर कुणालाही सवलतीत प्रवास करू देऊ नये असे आदेश केंद्रसरकारनं दिले आहेत.

कोविड-एकोणीसच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं ट्रान्स हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी रेल्वे गाडीच्या सोळा फेऱ्या उद्यापासून 31 मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत.

त्याचबरोबर नांदेड एक्सप्रेस, भुसावळ-पुणे तसंच मिरज-हुबळी एक्सप्रेस, बिडर एक्सप्रेस, काझिपेट-ताडोबा, मडगाव डबल डेकर एक्सप्रेस, पुणे-सोलापूर इन्टरसिटी एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेससह 23 गाड्या 31 मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत,ही माहीती मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

पश्चिम रेल्वेनही आज आणखी दहा गाड्या रद्द केल्या असून, एकूण 84 गाड्या रद्द झाल्या आहेत.