मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी शुक्रवार, दिनांक २० मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राजभवन येथे होणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी न्या. धर्माधिकारी यांना पदाची शपथ देतील.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शपथविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांसह केवळ निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.