नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम कमी करणं, आणि नागरिकांना मदत करणं, यासाठी अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक सहकार्य देण्याच्या योजनेच्या मसुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी स्वाक्षरी केली आहे.
या योजनेनुसार कोरोनामुळे कामावर जाऊ न शकलेल्या कामगारांना सहा दिवसांची पगारी रजा, विनामूल्य कोरोना चाचणी,बेरोजगारी विमाभत्ता, मोफत भोजन आणि आरोग्यविषयक खर्चासाठीच्या रकमेचा समावेश आहे.
अमेरिकेत आठ हजार ७३६ कोरोना रूग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत १४९ लोकांचा मृत्यु झाला आहे.