नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 रोगाचा फैलाव रोखणयासाठी जनतेनं येत्या रविवारी स्वतःहून संचारबंद पाळावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल राष्ट्राला संबोधित होते. रविवारी संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत लोक, सफाई कामगार यांचे त्यांच्या अविश्रांत सेवेबद्दल आभार मानावेत, असंही प्रधानमंत्री म्हणाले.

65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनी काही दिवस घरबाहेर पडू नये, आणि जनतेनं एकांतवास पाळावा, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. नव्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संकल्प आणि संयम आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

बाजारपेठा, गर्दीची ठिकाणं टाळावित तसंच विनाकारण रुग्णालयात तपासणीसाठी जाऊ नये, वस्तुसंचय करणं टाळावं, असंही प्रधानमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. या काळात कामावर हजर राहू न शकलेल्या कर्मचा-यांचा पगार कापूर नये, असं आवाहन त्यांनी उद्योग समूहाला केलं.

अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. नैर्सगिक संकटांचा फटका सर्वसाधारणपणे काही देश किंवा राज्यांपुरता मर्यादित असतो, असं प्रधानमंत्री म्हणाले.