नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आता राज्यात रुग्णांची एकूण संख्या ५२ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हे रुग्ण आढळले आहेत.

या आधी जे रुग्ण दाखल झाले होते त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्या नंतर या पाच रुग्णांना आज घरी पाठवलं आहे. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल तर त्याचा संपूर्ण खर्च सरकार तर्फे केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत परदेशातनं आलेल्या एकूण 1036 प्रवाशांची तपासणी केली आहे. आता आपण 6 लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या 12 होईल, प्रधानमंत्र्यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला जनतेनं १०० टक्के प्रतिसाद द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.