नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची झळ दशावतारी कलेला सुद्धा बसली आहे. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करावेत असे आदेश सरकारने दिल्यानं सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या ७२ पेक्षा जास्त दशावतारी मंडळांच्यासुमारे अकराशे कलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दशावतार कलाकारांचे या हंगामात होणारे सुमारे ५ हजार दशावतार प्रयोग रद्द होण्याची भीती दशावतारीकलाकारांनी व्यक्त केली आहे. यामुळे कोट्यावधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आज सर्व दशावतारी कलाकार आणि मंडळांच्या मालकांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि सरकारने दशावतारी कलाकारांना मदत करावी अशी मागणी केली.