नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आज दुपारी दोन वाजता सुरु होणार होतं. परंतु त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

थोड्यावेळापूर्वी भोपाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आपण लवकरच राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या 22 बंडखोर आमदारांनी आपले राजीनामे दिल्यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होतं.