नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खोट्या बातम्या आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब, टिकटॉक आदी  सोशल मीडियावरुन कुठल्याही प्रकारच्या खोट्या बातम्या, अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा अफवा आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात सहा महिन्यांपर्यंत कैद आणि हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करण्याचा इशाराही महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने दिला आहे. अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या तक्रारी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा www.cybercrime.gov.in यावर नोंदवाविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.