नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देशभरातल्या न्यायालयात सुरू असलेल्या तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या पीठानं हे निर्देश दिले आहेत.
पुराव्यांची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करू नये, पण हे आवश्यक असल्यास संबंधित न्यायाधीशांनी न्यायालयात सोशल डिस्टंसिंगच्या सूचना पाळून न्यायालयात प्रत्यक्ष तपासणी करावी असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.