नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मध्ये शिथिलता आणल्यानंतर राज्य सरकारला पहिल्याच दिवशी मद्यविक्रीतून ११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. काल राज्यात जवळपास चार लाख लिटर दारूची विक्री झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली.

काल सकाळपासूनच दारू विक्रीच्या दुकानात बाहेर भल्या मोठ्या रांगा होत्या. काही जिल्ह्यात अजूनही दारूविक्री बंद आहे. राज्य सरकारला दर दिवशी दारू विक्रीतून जवळपास ७८ कोटींचा महसूल मिळतो, पण टाळेबंदी मुळे हा महसूल बुडाला आहे, असंही उमप यांनी सांगितलं.