नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उपनगरातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डायलिसीस केंद्र सुरु केलं आहे. ‘रुग्णालयात १६ खाटा डायलिसीससाठी उपलब्ध असून त्यातले ४ बेड हे कोविड रुग्णांसाठी असतील. तसंच जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयातही लवकरच डायलिसीस केंद्र सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.