नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठ मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज काँग्रेस भवनात धुळे जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीनं विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या माता – पिता आणि त्यांच्या वीर पत्नींचा, तसच सेवानिवृत्त झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी  स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

पीडित महिलांना वैद्यकीय मदत, मानसिक आधार,कायदेशीर सल्ला, सुरक्षितता आणि तात्पुरता निवारा यासाठी राज्यात २६ जानेवारी रोजी महिला बालविकास विभागामार्फत वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्र सुरू करण्यात आली.

अहमदनगर इथं अवघ्या ४५ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात आतापर्यंत ४१ प्रकरणं  हाताळण्यात आली  आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणं कौटुंबिक वादाची होती. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे महिला आणि मुलींनी स्वसंरक्षणाकरीता स्वयंसिद्ध रहायला हवं, असं मत पूर्णेच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी महिला दिनानिमीत्त आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केलं.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्ह्यात पूर्णा इथल्या श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात आज, प्राध्यापक आणि कर्मचारी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट यशस्वी महिला सांभाळणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या सकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती नारी शक्ती पुरस्कारांचं वितरण करतील. महिला सक्षमीकरणात विशेषतः वंचित आणि गरीब महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येते.