नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही समाज माध्यमांमध्ये काही खाद्य पदार्थांचा आणि फळांचे पीएच मूल्य दाखवून अल्कली गुणधर्म असलेले हे पदार्थ खाण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे कोरोना विषाणूचा धोका कमी होतो असा दावा केला जातो आहे. या अहवालात जर्नल ऑफ वायरोलॉजी आणि अँटी वायरल रिसर्च चाही उल्लेख करण्यात आला आहे. ही खोटी बातमी असून त्यात दिलेली माहिती चुकीची आहे. या अहवाल १९९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यात नमूद करण्यात आलेला कोरोना विषाणू पूर्णपणे वेगळा आहे.

हे सर्वमान्य आहे की, अँटीऑक्सिडंट घटकांमुळे फळांमधून प्रतिकारशक्ती वाढते. मात्र केवळ त्यामुळे आजार पूर्णपणे रोखता येतील असा दावा करणे शास्त्रीय नाही.