नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

काल मंगळवारपर्यंत जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार ४०७ कोटी १३ लाख जमा केले. तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून आठ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये केले असल्याचं पवार यांनी सांगितलं.