नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या विना अनुदानित सिलेंडरची किंमत ६१ रुपये आणि ५० पैशांची कमी केली आहे. त्यामुळे मुंबई हे सिलिंडर आता ७१४ रुपयांना मिळेल.
मार्चपासूनची ही सलग दुसरी दर कपात आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात ५३ रुपयांची कपात करण्यात आली असून मुंबईतला नवा दर १ हजार २३४ रुपये एवढा आहे.