मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले असून जन्मोत्सव प्रकाशपर्व निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, गुरु नानक देव यांना त्यांचा जन्मोत्सव ‘गुरु पूरब’ निमित्त कोटी कोटी प्रणाम. नानक देव यांच्या मानव कल्याण, प्राणिमात्रांची सेवा करा आणि समता-बंधुतेच्या शिकवणीचे पालन करूया, हेच त्यांना विनम्र अभिवादन. नानक देव यांची जयंती प्रकाशपर्व निमित्त तमाम शिख बांधवासह, सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.