नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी आपली दक्षिण सीमारेषा सर्व अनावश्यक प्रवासासाठी आजपासून बंद केली आहे.
अमेरिका-कॅनडा सीमारेषा याआधीचं गेल्या मंगळवारपासून बदं केली आहे. कोविड-19 च्या संसर्गानं अमेरिकेत आत्तापर्यंत 230 जणांना प्राण गमवावे लागले असून 18 हजार हून जास्त रुग्णांना याची लागण झाली आहे.
न्यूयॉक, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या प्रमुख शहरांत रुग्णांची संख्या जास्त आहे. अमेरिकेनं कर भरण्याची अंतिम तारीख 15 एप्रिलहून 15 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.