नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत आज आणखी एका कोरोनाग्रस्त नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. मरण पावलेली ही व्यक्ती ६३ वर्षांची होती. या व्यक्तीला आणखी इतरही आजार होते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ७४ झाली आहे. काल हा आकडा ६४ होता, आज मुंबईत सहा तर पुणे इथं ४ कोरोनाग्रस्त नवीन रूग्ण सापडले.
देशात आता कोरोनानं बाधित झालेल्यांची संख्या ३३५ झाली आहे.दिल्लीत उद्या सकाळी सहा वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत सर्व कामकाज बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज वार्ताहर परिषदेत केली.
कर्नाटकातल्या नऊ जिल्ह्यातल्ह्यातही ३१ तारखेपर्यंत कामकाज बंद ठेवलं जाणार आहे.
राजस्थान मध्ये ३१ मार्चपर्यंत पूर्णतः बंद पाळण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिले आहेत.बिहार सरकारने बस सेवा, उपाहारगृह, आणि समारंभ सभागृह येत्या ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.