नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत आज सकाळी ८ वाजता बेस्ट प्रशासनानं १ हजार ६३६ बसगाड्या रस्त्यावर आणल्या. राज्यातील एसटी सेवा बंद केली आहे. आंतरराज्यातील एसटी सेवाही सरकारनं बंद केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सर्व मार्गावरील बससेवा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या काळात केवळ हॉस्पिटल, महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन, यांच्यासह इतर आपत्कालीन सेवा देणा-यांसाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.