नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या काळामध्ये एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनं डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

तर नागरिकांनी विविध प्रकारच्या बिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन माध्यमं वापरावीत, असं आर्थिक व्यवहार सचिव देबाशीष पांडा यांनी सांगितलं आहे. देशभरातल्या अनेक बँकांनी, डिजिटल व्यवहारांवरचं शुल्क माफ केलं आहे.

नागरिकांनी आर्थिक व्यवहारांकरता ऑनलाईन सेवांचा पर्याय स्वीकारुन बँकांमध्ये स्वतःजाणं टाळवं अशी अशी सूचना भारतीय बँक संघटनेनं केली आहे. बँकांनीही या काळात ग्राहकांना ऑनलाईन सुविधा घाव्यात असं संघटनेनं सांगितलं आहे.