नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत भारतातील अनेक राज्य असतील, या कालावधीत केवळ जीवनाश्यक सेवांचा पुरवठा सुरु राहिल.

उत्तर प्रदेश,छत्तीसगड,अरूणाचल प्रदेश,झारखंड,केरळ,दिल्ली,महाराष्ट्र राज्य बंद असून या निर्णयानुसार या क्षेत्रांमध्ये आता कलम १४४ लागू असेल.इतर सर्व सेवा कार्यालय संस्था आणि वाहतूक सेवा, सर्व आंतरराज्य बस सेवा, तसंच राज्यांतर्गत आणि शहरी बस सेवा बंद असतील. जे लोक मागच्या १४ दिवसांमध्ये परदेशातून राज्यात आले आहेत, त्यांनी स्वतःला घरातच वेगळं करून घ्यावं असं, आवाहनही  सरकारनं केलं आहे.