नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे इथून अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथं बदली झालेल्या स्टेट बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या हातावर घरातच विलगीकरण कक्षात राहण्याचा शिक्का असून सुद्धा मोर्शी इथल्या बँकेच्या व्यवस्थापकानं सदर महिलेला कामावर रुजू होण्यास सांगितल्यामुळे या व्यवस्थापकाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी या व्यवस्थापकाविरुद्ध तहसीलदार कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर तातडीनं बँकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं.

बँकेचं तातडीनं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. या व्यवस्थापकाने सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे त्यावर कारवाईची मागणी होत आहे.