नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. गहु, हरबऱ्याबरोबरच कांदा आणि द्राक्षाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच संत्रा, फळबाग पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना दोन ते तीन दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण होते आणि पाऊस सुरू  झाला.

आज दुपारनंतर देखील जिल्ह्यात वादळी वाऱ्या सह अनेक ठिकाणी पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सटाणा आणि त्र्यंबक तालुक्यात पाऊस झाला.

त्र्यंबक तालुक्यात वेळुंजे इथे गारपीट झाली. सातारा शहर आणि परिसरात दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

सांगली जिल्ह्यातील कांदे, मांगले इथेगारांसह अर्धा तास जोरदार पाऊस पडला. वादळीवाऱ्यासह गारपीट झाली.

शिराळा तालुक्यात्याल कांदे, मांगले गावात प्रथमच उन्हाळी पाऊस पडला.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव-जामोदसह अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.

अनेक ठिकाणी नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. धुळे शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत.