नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी – वारा आणि पाऊस झाला. या मुळे अनेक ठिकाणी रात्रभर विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे उशीरा पेरलेला गहू, उन्हाळी मूग आणि भुईमूग या पिकाचं तसंच फळबागांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
दरम्यान वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपिर इथ खंडित वीजपुरवठा सुरू करायला गेलेल्या रिझवान खान या तरुणाचा विजेच्या धक्क्यान मृत्यू झाला.