नवी दिल्ली : ‘हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सूपूर्द करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. गृह मंत्रालयाचे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो आणि भारतीय पोलीस फाउंडेशन यांनी संयुक्तपणे ही कार्यशाळा आयोजित केली होती. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण खात्याच्या सचिवांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले.
जगभरात गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून बायोमॅट्रिकचा वाढता वापर करण्यात येत असून पोलीस तपासात सहकार्य करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. बायोमॅट्रिकच्या वापराला इलेक्ट्रॉनिक्समुळे अधिक गती आणि अधिक अचूकता आली असून सध्याच्या जगात बायोमॅट्रिकचा वापर ही गरज बनली आहे.