नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कायद्यातील विविध तरतुदींनुसार 2016-17 या वर्षात 95 कंपन्यांविरोधात 2017-18 मध्ये 101 कंपन्यांविरोधात आणि 2018-19 मध्ये 75 कंपन्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट खात्याच्या मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
याखेरीज शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी सेबीने गेल्या 3 वर्षात सेबी कायदा 1992 च्या 15-आय अंतर्गत 22 कंपन्यांविरोधात आणि सेबी कायदा 1992च्या 11 बी कलमांतर्गत 211 कंपन्यांविरोधात कारवाई सुरू केल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले.
2018-19 या वर्षात सेबीला थकबाकीच्या 2,453 तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच सेबीने 2,746 तक्रारींचे निवारण केले. यात आधीच्या वर्षातील तक्रारींचा समावेशही आहे, अशी माहिती वित्तमंत्र्यांनी दिली.