नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजीपाला आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी कर्नाटक सरकारनं परवानगी दिली आहे. आजपासूनच ही वाहतूक सुरू होणार आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्याशी फोनवर चर्चा केली.

फळे, भाजीपाला आणि इतर कृषिमाल कर्नाटकमार्गे दक्षिण भारतात सर्वत्र पाठवावा लागतो. मात्र महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर वाहतूक बंद असल्यानं हा कृषिमाल पुढे जाऊ शकत नाही. यामुळे देशांतर्गत भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, गुळ, मिरची, हळद, सोयाबीन यासह अनेक मालाची वाहतूक खोळंबली आहे.

शेतीमालाची ने आण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं तालुका पातळीवर परवाने दिले आहेत. कागवाड चेक पोस्ट नाक्यावरील स्थानिक पोलीस प्रशासनाला त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्नाटकातल्या रस्त्यावर ठिकठिकाणी अडकलेल्या शेतीमाल भरलेल्या गाड्या कोल्हापूर, सोलापूर आणि  सांगलीमार्गे देशाच्या इतर भागात मार्गस्थ केल्या जाणार आहेत.