नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रादुर्भाव होत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे, पण ही वाढ धीम्या गतीनं होत आहे, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
लोकांनी सरकारनं सांगितलेल्या सूचनांचं पालन करावं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान कोरोना विषाणू बाधितांची देशातली संख्या ६४९ वर गेली आहे. यात ४७ परदेशी रुग्णांचा समावेश आहे.