नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू आहे. लोकांनी गर्दी करू नये, घरीच रहावं, असं आवाहन सरकार तर्फे केलं जात आहे. तरी सर्व नागरिकांनी १४ एप्रिलला घराबाहेर न पडता घरीच राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जबाबदारीनं वागावं, कोरोनाचा नायनाट झाल्यावर एकत्रितपणे, उत्साहानं बाबासाहेबांची जयंती साजरी करू, असंही ते म्हणाले.