राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले.