नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारी / केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उन्नतीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी करत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 21 राज्य / केंद्रशासित प्रदेशातल्या 72 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 4058 जागा वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत आतापर्यंत 3 राज्यातल्या 5 सरकारी महाविद्यालयातल्या 98 जागा वाढवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. याखेरीज 2019-20 साठी आलेल्या प्राप्त शैक्षणिक अर्जांपैकी 2153 नव्या पदव्युत्तर जागांसाठी मान्यता देण्यात अली आहे.
केंद्र सरकारने 22 नव्या एम्सची घोषणा केली होती. त्यापैकी पाटणा, रायपूर, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर आणि हृषीकेश ही सहा एम्स कार्यरत झाली आहेत.
नव्याने जाहीर एम्सपैकी महाराष्ट्रातल्या नागपूरचा समावेश असून सप्टेंबर 2020 पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.