पुणे : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त वैदयकीय अधीक्षक डॉ. पवन साळवे, सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर खिलारे, डॉ. प्रवीण सोनी तसेच कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील तयारीबाबत समाधान व्यक्त केले.