138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी)  आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील

नवी दिल्ली : कोविड-19 च्या संक्रमणाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वे ग्राहक (प्रवाशी) आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 138 आणि 139 या दोन 24 तास हेल्पलाईन कार्यान्वित केल्या आहेत. सूचना देखील स्विकारल्या जातील.

139 च्या माध्यमातून कॉल सेंटर आधारित एजंट आणि आयव्हीआरएस सेवा प्रदात्यांव्यतिरिक्त देशभरातील मोठ्या संख्येने असलेल्या त्याच्या इतर ग्राहकांपर्यंत भारतीय रेल्वेला पोहोचता यावे यासाठी 138 क्रमांकाचा वापर करण्याची कल्पना साकारण्यात आली. हे देखील स्पष्ट आहे की मोठ्या संख्यने बिगर रेल्वे विशेषतः कोविड-19 संबंधित चौकशी ही स्थानिक नागरिकांकडून स्थानिक भाषेतून केली जाऊ शकते. मागितलेली माहिती स्थानिक आणि प्रादेशिक देखील असेल.

रेल्वे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि सूचनांच्या अखंड देवाणघेवाणीसाठी भारतीय रेल्वेने मंडळ नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हे नियंत्रण कार्यालय 24 तास कार्यरत राहील आणि संचालक स्तरावरील अधिकारी त्याचे व्यवस्थापन करतील. हे कार्यालय रेल्वे ग्राहक आणि इतरांना भेडसावणाऱ्या अडचणींवर वेळोवेळी कार्यवाही करणे, सोशल मिडिया आणि विशेषतः ट्विटर वरील चालू ट्रेंडचे निरीक्षण करण्यासोबतच केंद्रीयकृत रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 138 आणि विकेंद्रित रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 139 वर आलेल्या कॉलचे परिक्षण करेल.

याशिवाय railmadad@rb.railnet.gov.in. या ईमेलवर देखील नागरिक तक्रारी, सूचना किंवा शंका पाठवू शकतात.

139 ही हेल्पलाईन सध्या निरंतर मध्यवर्ती कार्यरत आहे, तर 138 ही हेल्पलाईन कॉलरला थेट स्थानिक रेल्वे विभागाशी जोडेल जेणेकरून त्याला अद्ययावत स्थानिक आणि प्रादेशिक माहिती प्राप्त होईल. 138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी) आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील. सूचना देखील स्विकारल्या जातील.

हेल्पलाईन कर्मचाऱ्यांकडे रेल्वे तिकिटांचा परतावा/ राज्य/ जिल्हा/ रेल्वे वैद्यकीय सुविधा आणि कोविड-19 चा तपास आणि मदतीसाठी अद्ययावत स्थानिक/ प्रादेशिक/ राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक यासारखी सर्व माहिती उपलब्ध असेल.