मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र काेरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आला आहे. पुढचे १५-२० दिवस आपल्या सर्वांसाठीच कसाेटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
आज निर्णय घेतला आहे की राज्यभर शिवभोजन केंद्रे आहेत, ती केंद्रे २ तासाऐवजी ३ तास सुरू करा. त्यांचीसुद्धा क्षमता वाढवा असे सांगितले आहे. पण याचा अर्थ असा नाही की ३ तास आहे म्हटल्यावर तिकडे जाऊन गर्दी करणे, तिथे जेवायला गेल्यावर अंतर ठेऊन बसा की जेणेकरून एकमेकांचा संसर्ग होणार नाही
सविस्तर बातमी पाहा
महाराष्ट्र काेरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आलाआहे. पुढचे १५-२० दिवस आपल्या सर्वांसाठीच कसाेटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री #उध्दवठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.#WarAgainstVirus pic.twitter.com/cnB59JcF2Z
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) March 27, 2020