मुंबई : कोल्हापूर, सांगली या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी धरण सुरक्षा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  यासाठी पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहे.

अलमट्टी धरणाच्या विसर्ग बाबत सांगली पूर नियंत्रण कक्ष व अलमटी धरण नियंत्रण कक्ष एकमेकांशी सतत संपर्कात असून अलमट्टी धरणातून सध्या 5 लाख 57 हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात किमान पातळी राखण्याच्या आपल्या मागणीला त्यांनी प्रतिसाद देऊन संयुक्त पूर नियंत्रण करण्यास सहकार्य करत आहेत. याबाबत सचिव पातळीवर ही सतत संपर्क सुरु आहे. अशी माहिती पूर नियंत्रण कक्षातून दिली आहे.