मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बस मधून आता प्रवाशांसोबत मालवाहतूकही केली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब, उस्मानाबाद, भूम, परांडा, तुळजापूर, उमरगा या सहा आगारातल्या बस आसनव्यवस्था काढून वाहतुकीसाठी सज्ज केल्या जात आहेत.

त्यातून शेतीमाल, फळे, भाजीपाला, किराणा भुसार व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक  राज्यात सर्वत्र केली जाणार  आहे. एसटी बसमधून मालवाहतूक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आगार प्रमुख अथवा स्थानक प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन विभाग नियंत्रक साळवे यांनी केल आहे.